लुधियाना – पंजाबी चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेत्री दलजीत कौर यांचे निधन झाले. त्या ६९ वर्षांच्या होत्या. रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाबद्दल चाहते आणि तारे-तारकांनी दुःख व्यक्त केले.
अभिनेत्री दलजीत कौर ३ वर्षांपासून ब्रेन ट्युमरने आजारी होत्या. मध्यंतरी काही दिवस त्या कोमात होत्या. नंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. मात्र रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. १९७६ मध्ये दलजीची सिने कारकीर्द सुरू झाली होती. १९८०-९० च्या दशकात त्यांचे अनेक चित्रपट गाजले.