संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 25 September 2022

दारूची होम डिलिव्हरी बंद! उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – कोरोनाची परिस्थिती निवळली आहे. आता महाराष्ट्रात दारूची होम डिलिव्हरी सेवा बंद करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली आहे. गृह विभागाने उत्पादन शुल्क विभागाला पत्र लिहून याबाबत सूचना दिल्या होत्या.

दरम्यान, अजित पवार यांनी म्हटले आहे की, कोविडचे प्रमाण कमी असल्याने आम्ही दारूची होम डिलिव्हरी बंद करत आहोत. लॉकडाऊनच्या काळात ही व्यवस्था होती. राज्याच्या गृह विभागाने महाराष्ट्र उत्पादन शुल्क आयुक्तांना पत्र लिहून आता दारूची होम डिलिव्हरी बंद करण्याबाबत सूचना केली होती. गृह विभागाचे म्हणणे आहे की, लॉकडाऊनदरम्यान सोशल डिस्टन्सिंग सुनिश्चित करण्यासाठी होम डिलिव्हरी प्रणाली लागू करण्यात आली होती. महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्यानंतर दारूची होम डिलिव्हरी सुरू करण्यात आली होती. मात्र, ही डिलिव्हरी परवानाधारक दुकानांसाठी होती. ग्राहकांच्या सुरक्षेसाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. आता केसेस कमी झाल्यामुळे सरकारने होम डिलिव्हरी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले की, सध्या कोरोनाबाधित रुग्ण वाढत असून ही काळजीची बाब आहे. मास्क वापरणे गरजेचे असून राज्य सरकारचे परिस्थितीवर लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. मागील अनुभव लक्षात घेता सर्व संबंधित अधिकारी, यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami