रत्नागिरी:- रिफायनरी प्रकल्पा संदर्भात सरकार सकारात्मक पावले टाकत आहे. आम्ही शेतकऱ्यांचे गैरसमज दूर करण्यासाठी आम्ही यंत्रणा उभी केली आहे. शेतकऱ्यांनी दादागिरी आणि दडपशाही करून कोणीही रिफायनरीला विरोध करू नये. शेतकऱ्यांचे आम्ही ऐकायला तयार आहोत असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.
आम्ही सर्वतोपरी पॅकेज देण्यासाठी तयार आहोत. शाळा, आराेग्य यंत्रणा, कौशल्य विकासच्या माध्यमातून विकास या सर्व गोष्टी आम्ही करण्याच्या तयारीत आहाेत. दरम्यान हे जाळून टाकू तिकडे तोडफाेड करु ही भाषा न करता सरकार बराेबर चर्चा करावी असे आवाहन सामंत यांनी केले आहे.उदय सामंत पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जे काेणी टीका करताहेत त्यांच्याबद्दल काही बाेलायची गरज नाही. ते देखील डावाेसला जाऊन आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात परदेशी गुंतवणुकदार माेठ्या प्रमाणात येऊ शकतात हे दाखवून दिले आहे.