मुंबई-दादर रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांकावर होणारी प्रवाशांची वाढती गर्दी कमी करण्यासाठी आता फलाट क्रमांक ४ आणि फलाट क्रमांक ५ च्या मधोमध एक नवीन फलाट क्रमांक ४- ए नावाने नवीन फलाट उभारला जाणार आहे. रेल्वे प्रशासनाने तशी तयारी सुरू केली आहे.
सध्या फलाट क्रमांक ४ आणि फलाट क्रमांक ५ च्या मध्ये लोखंडी जाळीचे कुंपण आहे. हे कुंपण हटवून फलाट क्रमांक ५ चा देखील पर्याय करून देण्याचे काम सुरू आहे. तसेच सर्व तपासणीअंती आणि रेल्वेगाड्यांची वाहतुक अबाधित ठेवून हे शक्य झाल्यास फलाट क्रमांक ‘ ४ – ए ” या नव्या फलाटावरून प्रवाशांना लोकल पकडणे शक्य होणार आहे ,असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.