संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 25 September 2022

दाक्षिणात्य अभिनेत्री दिपाची घरातच गळफास लावून आत्महत्या

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

चेन्नई – दाक्षिणात्य अभिनेत्री दीपा उर्फ पॉलीन जेसिका ही काल रविवारी चेन्नईतील तिच्या घरात मृतावस्थेत आढळून आली.तिने गळफास लावून आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना तिच्या घरातून सुसाइड नोट सापडली आहे त्यात तिच्या आत्महत्येमागे प्रियकरासोबतचे मतभेद असल्याचे सांगत तिने चिठ्ठीत प्रेमप्रकरणाचा उल्लेख केला आहे.
दीपाने तिच्या पालकांच्या फोनला प्रतिसाद देणे थांबवल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. दीपाचा मित्र प्रभाकरशी तिच्या कुटुंबियांनी संपर्क साधला. त्यानंतर प्रभाकरन हा तिला पाहण्यासाठी विरुगंबक्कम परिसरातील मल्लीगाई अव्हेन्यू येथे असलेल्या तिच्या घरी गेला तेव्हा ती त्याला मृतावस्थेत आढळली. पोलिसांनी मृतदेहाजवळून एक सुसाइड नोट जप्त केली आहे.त्यात दीपाने नमूद केले आहे की, तिचे कोणाशी तरी प्रेमसंबंध बिघडले होते.ज्यामुळे तिने आपले जीवन संपवण्याचा निर्णय घेतला.तिच्या आत्महत्येला कोणीही जबाबदार नसल्याचेही तिने नमूद केले.या घडामोडींनंतर दीपाचा भाऊ दिनेश याने कोयंबेडू पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.२९ वर्षीय अभिनेत्री दीपाने अनेक तमिळ चित्रपटांमध्ये काम केले आहे. ज्यात तिचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘वैधा’ हा चित्रपट आहे. ‘थुप्परीवलन’ चित्रपटात तिच्या आणखी एका महत्त्वपूर्ण भूमिकेचे कौतुक झाले होते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami