मुंबई – सध्या दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आपल्या उत्कृष्ट अभिनयाने आणि वादग्रस्त विधानाने भारतात चर्चेत राहणारा अभिनेता किच्चा सुदीप तब्बल ३१ गाई दत्तक घेणार आहे.
किच्चा नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानांनी चर्चेत असतो.आता पुन्हा एकदा तो चर्चेत आला आहे.सध्या चर्चेत तो त्याच्या वादग्रस्त विधानांनी नाही तर एका उत्कृष्ट कामगिरीने चर्चेत आहे.किच्चाने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. अभिनेता किच्चा हा पुण्यकोटी दत्तू योजनेच्या अंतर्गत कर्नाटकच्या प्रत्येक जिल्ह्यातून एक अशा तब्बल ३१ गायी किच्चा सुदीप दत्तक घेणार आहे.
किच्चा सुदीपने कर्नाटकचे पशुसंवर्धन मंत्री प्रभु बी चव्हाण यांच्या निवासस्थानी गुरुवारी गौ पुजा केली. गौ पुजा करताना त्याने गायींच्या संवर्धनासाठी राज्य सरकार करत असलेल्या कामांची प्रशंसा केली आहे. ‘कर्नाटक राज्य सरकारने माझी पुण्यकोटी दत्तू योजनेच्या ब्रॅंड अॅम्बिसीडरपदी नियुक्ती करण्यात आली असल्याने माझ्या जबाबदारीत आणखी एक भर पडली आहे.’असे यावेळी किच्चा सुदीप म्हणाला.