संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

थरूर यांच्या जाहीरनाम्यात भारताचा चुकीचा नकाशा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली:- भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी कॉंग्रेसचे नेते खासदार डॉ. शशी थरूर यांनी नामांकन भरले. मात्र शशी थरूर यांनी जाहीरनामा जारी केला. पण त्यात भारताचा चुकीचा नकाशा दिला होता. थरूर यांच्या जाहीरनाम्यात जम्मू-काश्मीरचा पीओके आणि लडाखचा काही भाग दाखवण्यात आलेला नाही. त्यानंतर यावर वाद निर्माण झाला. थरूर यांनी माफी मागत थरूर तात्काळ नकाशा दुरुस्त करून पीओकेसह संपूर्ण काश्मीर दाखवले.भाजपाने शशी थरूर यांच्यावर जोरदार टीका केली.

शशी थरूर यांच्या जाहीरनाम्यात जम्मू-काश्मीरचा पीओके आणि लडाखचा काही भाग दाखवण्यात आलेला नाही. काँग्रेसचे अध्यक्षपदाचे दावेदार शशी थरूर यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात भारताचा विकृतरित्या नकाशा दाखवला आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू असून, काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेले मात्र भारताचे तुकडे करण्याच्या नादात आहेत. यामुळे गांधींची मर्जी राखता येईल, असे त्यांना बहुधा वाटत असावे, अशी टीका भाजपा नेते अमित मालवीय यांनी केली आहे.

भाजपा नेते अमित मालवीय यांनी वादावर भाष्य केले.त्यांनी 21 डिसेंबर 2019चे शशी थरूर यांच्या ट्वीटचा संदर्भ देत, त्यांनी म्हटले, शशी थरूर यांनी हे पहिल्यांदाच केलेले नाही. त्यांनी अशी कृती केले आहे. भारताचे तुकडे व्हावेत, अशी त्यांची इच्छा आहे,असे ट्वीट त्यांनी केले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami