अगरतळा – त्रिपुरा विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तेथे 81 टक्के मतदान झाले असून 259 उमेदवारांचे भवितव्य आता मतदानपेटीत बंद झाले आहे. या निवडणुकीचा निकाल 2 मार्चला लागणार आहे.
मतदानादरम्यान 42 मतदान केंद्रावर ईव्हीएममध्ये बिघाड झाला होता. त्यामुळे हा बिघाड दुरुस्ती होईपर्यंत केंद्राबाहेर लोकांचा लांबच लांब रागा लागल्या होत्या. तर काही ठिकाणी सीपीएम आणि डाव्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याने गोंधळ उडाला, त्यात तीन जण जखमी झाले. या राड्याचा परिणाम मतदानांवर झाल्या नसली तरी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.