संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 27 September 2022

तैवानच्या संरक्षणासाठी अमेरिका सज्ज! राष्ट्राध्यक्ष बायडन यांचा चीनला इशारा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली : चीन आणि तैवानमध्ये तणावाची स्थिती असताना दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. तैवानवर हल्ला झाल्यास अमेरिकन सैन्याकडून त्यांचे संरक्षण केले जाईल,अशी स्पष्ट भूमिका व्यक्त करत बायडन यांनी चीनला इशारा दिला आहे. एका मुलाखतीत बायडन यांनी तैवानच्या संरक्षणासाठी अमेरिकासोबत असल्याचे स्पष्ट केले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी एका मुलाखती दरम्यान, तैवानबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. तैवानच्या संरक्षणासाठी अमेरिकन सैन्य प्रयत्न करणार का, असे विचारले असता त्यांनी होय असे उत्तर दिले. तैवानवर अभूतपूर्व हल्ला झाल्यास अमेरिका त्यांचे संरक्षण करेल असे बायडन यांनी म्हटले. तैवानबाबत राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी अलिकडच्या काळात घेतलेली ही स्पष्ट भूमिका असल्याचे म्हटले जात आहे. तैवानच्या पाठिशी उभे राहण्याची भूमिका अमेरिकेची आहे. मात्र, बायडन यांनी त्यावर आता अधिकच स्पष्ट भूमिका घेतली आहे. यामध्ये आता, अमेरिकन सैन्य तैवानच्या भूमीवर उतरू शकतात, यावर भूमिका घेतली आहे. व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्यांनीदेखील अमेरिकेचे तैवानबाबत असलेल्या धोरणात कोणताही बदल झाला नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, चीन आणि तैवान दरम्यानचा तणाव वाढत आहे. तैवान हा आमचाच भाग असल्याचा दावा चीनकडून सातत्याने केला जातो. चीनकडून ‘वन चायना’ धोरणाचा अवलंब केला जातो आहे. दरम्यान, अमेरिकन संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांच्या दौऱ्यावर नाराज असलेल्या चीनने आपली विमाने तैवानच्या हद्दीत घुसवत, यापुढे होणाऱ्या परिणामांना प्रनमाण अमेरिका जबाबदार असेल आणि याची किंमत अमेरिकेला मोजावी लागेल, असा इशाराही चीनने दिला होता.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami