संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

तेलंगणाच्या सिकंदराबादमध्ये हॉटेलला भीषण आग! ८ जणांचा होरपळून मृत्यू

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

हैदराबाद – तेलंगणाच्या सिकंदराबादमध्ये हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत ८ जणांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेत खिडकीतून उड्या टाकल्यामुळे अनेक जण जखमी झाले आहेत. हॉटेलच्या तळमजल्यावर इलेक्ट्रिक स्कूटर चार्जिंग युनिटला आग लागली. ती पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर पसरली, अशी माहिती हैदराबाद पोलिस आयुक्त सी. व्ही. आनंद यांनी दिली. या आगीच्या चौकशीचे आदेश तेलंगणाचे गृहमंत्री मोहम्मद महमूद अली यांनी दिले आहेत. दरम्यान, यातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी २ लाख आणि जखमींना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली आहे.
तेलंगणाच्या सिकंदराबादमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर चार्ज करताना शॉर्टसर्किट झाले. त्यामुळे हॉटेलला आग लागली. हॉटेलच्या तळमजल्यावर चार्जिंग पॉइंट आहे. या घटनेनंतर स्कूटरचा मालक पळून गेला. तळमजल्यावर लागलेली आग पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर पसरली. त्यामुळे हॉटेलमधील नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी खिडकीतून उड्या मारल्या. त्यात अनेक जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशामन दलाच्या जवानांनी अनेक तास झुंज देऊन आग आटोक्यात आणली. आगीत ८ जणांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेनंतर हॉटेलच्या बिल्डिंगचा मालक आणि इलेक्ट्रिक स्कूटरचा मालक दोघेही फरार झाले आहेत. त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. इलेक्ट्रिक स्कूटर चार्जिंग पॉइंटवर लोड आल्यामुळे शॉर्टसर्किट होऊन आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami