संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 28 November 2022

तुझ्या धर्माचा खेळ करशील का? मुकेश खन्नाचा सैफला थेट प्रश्न

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- आदिपुरुष सिनेमाच्या टिझरवरून सैफ अली खानवर चित्रपटसृष्टीतूनही टीका केली जात आहे. दीपिकानंतर आता शक्तिमान फेम मुकेश खन्नानेही संताप व्यक्त केला आहे. पैशांचा वापर हिंदू धर्माच्या व्यक्तिरेखांचा अपमान करण्यासाठी करू नका. त्याचा परिणाम चांगला होणार नाही. रामायणातील व्यक्तिरेखा बदलणारे तुम्ही कोण? तुझ्या धर्माचा आणि धार्मिक व्यक्तिरेखांचा खेळ करशील का? असा थेट प्रश्न त्यांनी सैफला विचारला.

आदिपुरुषच्या टिझरमधील राम, रावण आणि हनुमानाचा लुक लोकांना रुचलेला नाही. त्यामुळे ते बायकॉटने तुझे थोबाड असे काही रंगवतील की ते तुला कळणार नाही. हिंदू धर्माचा नुसता खेळ करून ठेवला आहे. देवी-देवतांचे लुक बदलाल तर सिनेमे चालणार नाहीत. टिझरमध्य़े रावण बनलेला सैफ रावण कमी आणि खिलजीच जास्त वाटतो. मुघलासारखा लुक दिल्यावर कसा दिसेल हा रावण? कुठे राम? कुठे रामायण आणि कुठे हा मुघलांचा लुक. विनोद आहे का? हा सिनेमा चालणार नाही. पैशांच्या जोरावर धार्मिक व्यक्तिरेखांची छेडछाड करू नका. धर्माचा खेळ खंडोबा करू नका. पाहिजे तर तुमच्या धर्माचा खेळ खंडोबा करा. रामायणातील व्यक्तिरेखा बदलणारे तुम्ही कोण? तुम्ही तुमच्या धर्मातील धार्मिक व्यक्तिरेखा बदलाल का? असा प्रश्नांचा भडिमार मुकेश खन्ना यांनी सैफवर केला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami