संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 26 September 2022

तुकाराम महाराजांच्या अश्व रिंगणाने
भाविकांच्या डोळ्याचे पारणे फेडले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

इंदापूर – जगदगुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिले अश्व रिंगण इंदापूर तालुक्यातील बेलवाडीत गुरूवारी मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी पालखी सोहळ्यातील वारकरी भाविकांसह परिसरातील ग्रामस्थांनी हजेरी लावली होती. या रिंगण सोहळ्याने भाविकांच्या डोळ्याचे
पारणे फेडले. सणसर येथील मुक्कामानंतर तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याचे पहिल्या अश्व रिंगणासाठी बेलवाडी येथे ‘ज्ञानोबामाऊली-तुकाराम’ अशा जयघोषात आगमन झाले. सकाळी सात वाजल्यापासूनच रिंगणस्थळावर भाविकांनी गर्दी केली होती. अश्व रिंगण सोहळ्याची सुरूवात अक्षय मचाले यांच्या मानाच्या मेंढ्यांच्या रिंगणाने झाली. यानंतर टाळकरी, विणेकरी, तुळसी वृंदावन धारक महिला, झेंडेकर्‍यांचे रिंगण पार पडले. यावेळी विठू नामाच्या गजरात रिंगणासाठी धावताना आबाल-वृध्दांचे भान हरपले. भाविकांनी रिंगण सोहळ्या दरम्यान अलिखित शिस्तबद्ध नियमांचे दर्शन घडवले. यानंतर मानाच्या अश्व रिंगणाला सुरूवात होताच उपस्थित लाखो भाविकांनी ज्ञानोबा-तुकारामचा एकच जयघोष केला. या जयघोषाने अवघे आसमंत दुमदुमले.
अश्व पुढे जाताच त्याच्या चरणी असणारी रज भाळी लावण्यासाठी झुंबड उडाली.
यानंतर महिला-पुरूषांनी फुगड्यांचे फेर धरले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami