संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 25 September 2022

तिस्ता सेटलवाडला यांना एटीएसने घेतले ताब्यात

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- गुजरातमध्ये 2002 मध्ये झालेल्या दंगलीप्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि इतरांना विशेष तपास पथकाने दिलेल्या क्लिनचीटला आव्हान देणारी माजी काँग्रेस खासदार एहसान जाफरी यांच्या विधवा पत्नी झाकिया यांची याचिका सुपप्रीम कोर्टाने काल फेटाळली आणि एसआयटीचा अहवाल कायम ठेवला आहे. त्यानंतर आता गुजरात एटीएस अ‍ॅक्शन मोडमध्ये आली असून सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांना एटीएसने ताब्यात घेतले. त्यांना सांताक्रुझ पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते.

गुजरात एटीएसने तिस्ता सेटलवाड यांच्याविरोधात मुंबईतील सांताक्रूझ पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता. ज्यामध्ये त्यांच्यावर आयपीसीच्या कलम 468 आणि 471 अंतर्गत खोटारडेपणाचा आरोप करण्यात आला आहे. एटीएस अधिकारी जस्मिन रोजिया यांनी सांगितले की, तिस्ता सेटलवाडला सांताक्रूझ पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना अहमदाबाद शहर पोलीस ठाण्यात नेण्यात येईल. एटीएस अधिकार्‍याच्या म्हणण्यानुसार, त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही, फक्त ताब्यात घेण्यात आले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami