नव्वी दिल्ली:- आम आदमी पक्षाच्या व्यापार शाखेचे राज्य सचिव संदीप भारद्वाज यांनी गुरुवारी राहत्या घरी आत्महत्या केली.दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भारद्वाज यांनी त्यांच्या राहत्या घरात आत्महत्या केली असून सीआरपीसीच्या कलम 174 अंतर्गत सदर प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
संदीप भारद्वाज हे व्यवसाय होता. राजौरी गार्डनमधील भारद्वाज मार्बल्सचे मालक होते. या सगळ्या प्रकरणावर भाजपने आपवर गंभीर आरोप केले.भाजपच्या आय.टी.सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी म्हटले की,भारद्वाज यांनी आगामी दिल्ली महापालिका निवडणुकीच्या तिकीटासाठी मोठी रक्कम दिली होती, मात्र केजरीवाल यांनी तिकीटासाठी त्याहूनही अधिक रक्कम देणाऱ्याला ते तिकीट विकले होते. मालवीय यांनी आरोप केला आहे की केजरीवाल यांच्या पक्षाने दिल्लीची वाट लावलीच आहे आता कुटुंबेही उद्धवस्त करण्यास सुरुवात केली आहे.दरम्यान आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारद्वाज यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे.