संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 27 September 2022

तासाभराचा विमानप्रवास सात तासांवर, चिपी विमानतळावर कोकणवासीय ताटकळले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

सिंधुदुर्ग -चिपी विमानतळावर बुधवारी मुंबईवरून सिंधुदुर्गमध्ये येणारे विमान तब्बल ५ तास २० मिनिटांनी उशिरा आल्याने प्रवाशांना मोठा फटका बसला आहे. हे विमानतळ सुरू झाल्याने मुंबई ते सिंधुदुर्ग प्रवास एका तासावर आला. मात्र अशा पध्दतीने नियोजित वेळेपेक्षा जास्त ५ ते ७ तास वेळ लागल्याने विमान प्रवासी संतप्त व्यक्त केला.
मुंबईवरून येणाऱ्या विमान प्रवाशांना नेण्यासाठी येणाऱ्या कुडाळ व मालवण एसटी आगारातून एसटी बस विमानतळावर वेळेत सकाळी ११.३० वाजता दाखल झाल्या होत्या. मात्र अचानक विमान येण्याच्या वेळेत बदल झाल्याने दोन्ही बस गाड्या प्रवाश्यांची प्रतिक्षा न करताच आपल्या वेळेनुसार १.४० वाजता मार्गस्थ झाल्या. या विमानतळावरुन मुंबईला जाणारे प्रवासी नियमित वेळेत जेवणासाठी मुंबईत पोचतात. मात्र अचानक विमानाच्या वेळेत बदल झाल्यावर त्या प्रचंड त्रास सहन करावा लागला. सिंधुदुर्ग विमानतळावर कॅन्टीन उपलब्ध नसल्याने प्रवाशांवर उपासमारीची वेळ आली. चिपी विमानतळावरून विमानसेवा सुरू झाल्याने सिंधुदुर्ग ते मुंबई प्रवास तासावर आला. मात्र आज विमान ५ तास २० मिनिटे उशीरा आल्यामुळे हाच प्रवास ७ ते ८ तासांवर गेला. विमान सुरू झाल्यापासून हाउसफुल चालणारे विमान अशा हलगर्जीपणामुळे उशिरा पोहोचत आहे. आठ दिवसांपूर्वीही मुंबई विमानतळावरील तांत्रिक अडचणींमुळे नियोजित विमानाची वेळ बदलण्यात आली होती.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami