तासगाव – सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या तासगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कडाक्याची थंडी जाणवत आहे.या थंडीचा विपरीत परिणाम ग्राक्ष फळांवर होऊ लागला आहे.या गारठवणाऱ्या थंडीमुळे द्राक्षबागांवर स्पर्शजन्य समजल्या जाणाऱ्या भुरी रोगाचा फैलाव होऊ लागला आहे.
त्यामुळे द्राक्ष बागायतदार चिंतेत दिसत आहे.या रोगामुळे द्राक्षाचे घड पांढरे होऊ लागले आहेत. तसेच द्राक्ष मण्याच्या फुगीवरही या थंडीचा परिणाम होत आहे. तर दुसरीकडे या थंडीचा हरभरा,गहू आणि शाळू पिकाला चांगला फायदा दिसत आहे.
मागील आठ दिवसांपासून तासगाव तालुक्यात कडाक्याची थंडी जाणवत आहे.या थंडीमुळे द्राक्ष फळांवर भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसत आहे. थंडीमुळे द्राक्षांचे घड पांढरे पडू लागले आहेत.मण्याच्या फुगीवरही त्याचा विपरीत परिणाम होऊ लागला आहे. घड मोठे व्हावेत म्हणून शेतकरी विविध प्रकारची खते आणि औषधे बागांवर फवारत असतो.पण या थंडीमुळे ही मेहनत वाया जाऊ लागली आहे.तर दुसरीकडे रब्बीच्या हंगामातील हरभरा,शाळू,गहू या पिकांना मात्र ही कडाक्याची थंडी पोषक स्वरुपाची ठरत आहे. तासगाव तालुक्यात हजारो एकर जमिनीवर द्राक्षबागा पसरलेल्या दिसतात. तासगावची द्राक्षे चांगल्या प्रतीची असतात.बाजारात या द्राक्षांना चांगला भाव मिळत असतो.