ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर झोनमध्ये 1 डिसेंबर रोजी एक वाघीण मृतावस्थेत आढळून आली असताना आता आज सकाळी या प्रकल्पात वाघिणीचे चार बछडे मृतावस्थेत आढळून आल्याने वन खात्यात खळबळ उडाली आहे.
वनाधिकारी गस्तीवर असताना वाघिणीचे चार बछडे मृतावस्थेत आढळून आले. घटनेची माहिती ताडोबा प्रकल्पाचे संचालक डॉ. जितेंद्र रामगावकरांनी दिली. त्यांनतर रामगावकर घटनास्थळी पोहोचले आणि सर्व घटनेचे निरिक्षण केले. त्यात त्यांनी मोठ्या वाघाने या चार बछड्यांवर हल्ला केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आलेे. ताडोबा व्यवस्थापनाने मृत्यूचे अधिकृत कारण सांगितले नाही. मात्र, मृत शवकांची उत्तरीय तपासणी केल्यानंतरच अधिकृत कारण समोर येणार आहे.
यापूर्वी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील शिवनी वनपरिक्षेत्रातील वासेरा नियतक्षेत्रात ‘टी-75या वाघिणीचा मृतदेह आढळला होता. त्यानंतर मोहर्ली वनपरिक्षेत्रातील आगरझरी जंगलातील कक्ष क्रमांक 189 मध्ये ‘टी-60
या वाघिणीचा मादी शावक मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे.