संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 29 September 2022

ताजमहालसह सर्व स्मारकांत उद्या पर्यटकांना मोफत प्रवेश

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

आग्रा – आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मंगळवारी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने ताजमहालसह आग्राच्या सर्व संरक्षित स्मारकांमध्ये पर्यटकांना मोफत प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्‍वी फतेहपूर सिक्रीच्या पंचमहालमध्ये योग करणार आहेत. एएसआयने 5 हजार लोकांना योग करण्याची तयारी सुरू केली आहे.
21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणने या दिवशी ताजमहालसह सर्व स्मारकांमध्ये पर्यटकांना मोफत प्रवेश देण्याचा आदेश जारी केला आहे. एएसआयच्या आग्रा सर्कलचे अधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञ राजकुमार पटेल यांनी सांगितले की, ताजमहालसह ऐतिहासिक वास्तूंमध्ये 18 एप्रिल रोजी जागतिक वारसा दिन आणि 19 नोव्हेंबर रोजी जागतिक वारसा सप्ताह आणि 8 मार्च रोजी महिला दिनी केवळ पर्यटकांना प्रवेश विनामूल्य देण्यात येतो. यावेळी प्रथमच योग दिनानिमित्त मंत्रालयाने ताजमहालसह इतर संरक्षित स्मारकांमध्ये पर्यटकांना मोफत प्रवेश दिला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami