मुंबई – मुंबईहून कालिकतला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानात आज सकाळी उड्डाणानंतर १० मिनिटांत तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे त्याचे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग झाले. त्यात ११४ प्रवासी होते. ते सुदैवाने सुखरूप बचावले. बिघाड दुरुस्त केल्यानंतर ३ तास उशिराने या विमानाने कालिकतसाठी उड्डाण केले.
गेल्या काही दिवसांपासून विमानांच्या इमर्जन्सी लँडिंगच्या घटना वाढल्या आहेत. आज सकाळी ६.२५ वाजता मुंबईहून कालिकतला जाण्यासाठी एअर इंडियाच्या फ्लाईट एआय-५८१ विमानेने उड्डाण केले. मात्र त्यानंतर १० मिनिटांनी त्यात तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे ते पुन्हा तातडीने मुंबई विमानतळावर उतरवले. त्यात ११४ प्रवासी होते. विमानातील बिघाड दुरुस्त केल्यानंतर ३ तास उशीरा म्हणजे सकाळी ९.५० वाजता या विमानाने कालिकतसाठी उड्डाण केले.