अमरावती – मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सिपला वन्यजीव विभागात सेमाडोह रायपुर मार्गावर एका तलावाजवळ दोन बिबट्या मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मृतावस्थेतेतील एक बिबट्या चार वर्षाचा आणि दुसरा दीड वर्षाचा आहे.सर्पदंशामुळे अथवा विष दिल्याने हे दोन बिबट दगावल्याची चर्चा सुरु आहे.
जंगलात बिबट मृतावस्थेत आढळून आल्याची माहिती मिळतात शिपना वन्यजीव विभागाच्या वनसंरक्षक दिव्या भारती सहाय्यक वनसंरक्षक कमलेश पाटील वनपरिक्षेत्र अधिकारी सम्राट मेश्राम हे असेही वन खंड परिसरात पोहोचले. दरम्यान दोन्ही मृत बिबट्या अंगावर कुठलाही प्रकारच्या जखमीचे निशाण आढळून आले नाही पशुवैद्यकीय अधिकारी वैभव हागवणे आणि सीआर धनगर यांनी दोन्ही बिबट्यांचे शवविच्छेदन केले. नंतर ज्या ठिकाणी हे बिबट आढळून आले त्याच ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले मात्र हे दोन्ही विभट नेमके कशामुळे दगावले हे शाव विच्छेदन अहवाल समोर आल्यावरच स्पष्ट होणार आहे.