पुणे: शिवसेनेच्या आजच्या परीस्थितीला उद्धव ठाकरे जबाबदार आहेत. २०१९ मध्ये भाजपशी युती केली असती तर उद्धव ठाकरेंवर ही वेळ आली नसती अशी टीका करत पुण्यात रामदास आठवले यांनीही उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
कसबा पोट निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार हेमंत रासनेच्या प्रचारासाठी पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना रामदास आठवले यांनी देखील निवडणूक आयोगाच्या निर्णयाबाबत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे यांना दिले, ते लोकशाहीचा आदर करणारे आहे. आयोगाने दिलेल्या निर्णयाविरोधात ठाकरे हे न्यायालयात गेले, तरी त्यांना न्याय मिळणार नाही असे आठवले म्हणाले.