संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

तब्बल ४२ दिवस उलटून गेले तरी मृतदेहावर अंत्यसंस्कार नाही

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नंदुरबार – मृत्युनंतर एक दोन नव्हे तर तब्बल ४२ दिवस उलटुन देखील एका पित्याने आपल्या मुलीला मृतदेहावर अंत्यसंस्कार केलेले नाही.त्याचे कारणही तसेच आहे. आपल्या मुलीला न्याय मिळावा यासाठी तिचा अंत्यसंस्कार न करता तिचा मृतदेह मीठाच्या खड्यात पुरुन ठेवला आहे.मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली असतांना पोलिसांनी फक्त आत्महत्येचा गुन्हा नोंदवून घेतला असा गंभीर आरोप पीडित मुलीच्या वडिलांनी केला आहे. इतकेच नव्हे तर शवविच्छेदन अहवालात देखील तिच्यावरील अत्याचारांबाबत काही तपासणीच करण्यात आली नाही,त्यामुळेच या पित्याने ग्रामस्थांच्या मदतीने आता व्यवस्थेविरोधातच लढा सुरु केला आहे.

धडगाव तालुक्यातील खडक्या येथील एका विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाला होता. विवाहितने गळफास लावत आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले होते, मात्र ही आत्महत्या नसून हत्या आहे, तसेच पीडितेवर बलात्कार झाल्याचा आरोपही तिच्या वडिलांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे पीडितेच्या वडिलांनी आपल्या मुलीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार न करता तिचा मृतदेह हा मीठाच्या खड्ड्यात पुरुन ठेवला आहे. पीडितेच्या वडिलांचा आरोप आहे की, तालुक्यातील वावी येथील रहिवाशी असलेल्या एका तरुणाने आणि अन्य एकजणाने बळजबरीने पीडितेला गाडीवर बसवून १ ऑगस्टला गावाबाहेर घेऊन गेले होते. यानंतर पीडितेचा तिच्या नातलगाला फोन आला. या फोनवरील संभाषणात तिने तिच्यासोबत घडलेली आपबीती सांगितली. पीडितेने फोनवर सांगितले की,त्या तरुणासह जणांनी तिच्यावर चित्रपटाप्रमाणे कुकर्म केले, तसेच ते मला मारुन टाकतील,अशी ती म्हणाली होती.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami