संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 27 March 2023

ढाक्यात बॉम्बस्फोट १५ ठार १०० जखमी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

ढाका – बंगला देशाची राजधानी ढाका येथील एका इमारतीत आज भीषण बॉम्बस्फोट झाला . या बॉम्बस्फोटात १५ जणांचा मृत्यू झाला . तर १०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले. या सर्वाना उपचारार्थ दाखल करण्यात आले असून त्यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आड वाढण्याची शक्यता आहे

मिळालेल्या माहितीनुसार, हा स्फोट एका इमारतीत झाला आहे. घटनेनंतर या घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. या अपघातातली मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अग्निशमन दलाचे अधिकारी रशीद बिन खालिद यांनी सांगितले की, अग्निशमन दलाच्या अकरा तुकड्या घटनास्थळी बचाव कार्य करण्यासाठी कार्यरत आहेत. स्फोट झालेली इमारत पाच मजली असून त्यातील तळमजल्यावर एक सॅनिटरी दुकान आहे. शिवाय एका बँकेचे कार्यालय देखील आहे. या स्फोटामुळे बॅंकेचे कार्यालय आणि दुकानाला आग लागली आहे. बीआरटीसी बस काउंटरजवळ दुपारी ४. ४५ च्या सुमारास हा स्फोट झाला. DMCH पोलिस चौकीचे प्रभारी निरीक्षक बच्चू मिया यांनी सांगितले की, आतापर्यंत सात मृतदेह बाहेर काढले असून १०० हुन अधिक जखमी असल्याचे समजते जखमींना ढाका मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. स्फोटाचे कारण लगेच समजू शकले नाही.

आजचे हवामान
ताज्या बातम्या