वॉशिंग्टन – अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाउंट पुन्हा सुरू झाले आहे. २२ महिन्यांपासून त्यांचे हे ट्विटर अकाउंट बंद होते. ट्विटरचे नवे मालक एलन मस्क यांनी याबाबत जनमताचा कौल घेतला. त्यानुसार त्यांचे ट्विटर अकाउंट पुन्हा सुरू केले आहे.
ट्विटर खरेदी केल्यानंतर एलन मस्क यांनी ट्विटर युजर्सना प्रश्न विचारला होता. डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाउंट पुन्हा सुरू करावे का? त्यावर त्यांनी वापरकर्त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या. त्यात १ कोटी ५० लाख वापरकर्त्यांनी ट्रम्प यांचे ट्विटर अकाउंट पुन्हा सुरू करावे, असे मत नोंदवले. त्यानुसार ट्रम्प यांचे हे खाते पुन्हा सुरू झाले आहे. जनमत चाचणीत ट्रम्प यांना ५२ टक्के लोकांनी पाठिंबा दिला, तर ४८ टक्के लोकांनी विरोध केला.