संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 05 February 2023

डोंबिवलीत आबालवृद्धांसाठी पर्वणी
१२ डिसेंबरपासून आगरी महोत्सव

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

डोंबिवली – पावसाळा संपून हिवाळा सुरु झाला कि डोंबिवलीकरांना विविध उत्सव आणि महोत्सवाचे वेध लागतात.त्यातच आबालवृद्धांसाठी पर्वणी ठरणारा आगरी युथ फोरम आयोजित आगरी महोत्सव कधी होणार? याबाबत सर्वांनाच उत्सुकता असते. यंदा १२ ते १९ डिसेंबर दरम्यान डोंबिवली पूर्व येथील संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रिडा संकुलात आयोजित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील व सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण आदी उपस्थित राहणार असल्याची माहिती आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे यांनी दिली.या महोत्सवात खास महिलांसाठी यशस्वी व आनंदी जीवनाची सूत्रे या विषयावर आदर्श कॉलेजच्या प्राचार्या डॉ. संगीता पांडे यांच्याशी सुसंवाद तर मराठी भाषा व मराठी शाळा वाचवा या विषयावरील परिसंवादामध्ये मराठी साहित्य परिषद पुणे कार्यवाह प्रकाश पायगुडे व आमदार बाळाराम पाटील यांचा सहभाग राहणार आहे. भूमिपुत्रांचे भवितव्य या विषयावरील परिसंवादामध्ये केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील,माजी मंत्री जगन्नाथ पाटील,दशरथ पाटील हे सहभागी होतील. तसेच चला तरुणांनो, उद्योजक बनुया या विषयावर प्रा. नामदेवराव जाधव यांचे व्याख्यान होणार आहे. याशिवाय ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील सुमारे २ हजार कलाकार आपली कला विविध सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून दाखविणार आहेत.या महोत्सवात एकूण १२० स्टॉल असणार असून त्यामध्ये ३५ स्टॉल हे आगरी कोळी खाद्यसंस्कृती जपणारे आहेत.याशिवाय मुलांच्या मनोरंजनासाठी आकाश पाळणे व इतर खेळणी यांची देखील व्यवस्था आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami