संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 28 November 2022

डोंबिवलीकर दर रविवारी राबविणार लोक सहभागातून स्वच्छता अभियान

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

डोंबिवली- कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या लोकसहभागातून स्वच्छता व नागरिक सुविधा अभियानांतर्गत पालिकेचे अधिकारी अतुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दर रविवारी आपापल्या परिसरात रहिवाशी,रोटरी क्लब डोंबिवली,पर्यावरण तज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते,ज्येष्ठ नागरिक आदींच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे.
यासंदर्भात नुकतीच ज्येष्ठ नागरिक संघ कार्यालय, निवासी विभाग, एमआयडीसी बस स्टॉप, डोंबिवली पूर्व येथे पालिका अधिकारी आणि रहिवाशांसह पालिका अधिकारी अतुल पाटील यांनी सर्व रस्ता व लगतच्या परिसराची पाहणी केली.
या पाहणीत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अस्ताव्यस्त कचरा टाकल्याने अस्वच्छ झालेला परिसर, रस्त्याची दुर्दशा, मानवी जीवितहानीस कारणीभूत व पडझड झालेली नाल्याची संरक्षक भिंत, रस्त्याच्या कडेला वीज खांबावरील नेहमीच बंद असणारी लाईट,रस्त्यावरील अनधिकृत स्टॉल आदी समस्या रहिवाशांनी मांडल्या.त्यानंतर पालिका अधिकारी अतुल पाटील यांनी लोकसहभागातून चळवळ उभारण्यासाठी मार्गदर्शन केले. याकरिता कडोंमनपा पूर्ण क्षमतेने काम करेल असे सांगितलेयावेळी प्रास्तविक माधव हुले तर आभार अशोकराव खोपडे यांनी मांडले.यावेळी पर्यावरण तज्ञ विजय घोडेकर,पर्यावरण दक्षता समितीचे ललित शाईवाले, उद्योजक अविनाश गरीबे आदींजण उपस्थित होते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami