मुंबई – भारतरत्न,महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मंगळवार ६ डिसेंबर रोजीच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त होणारी प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने आरक्षित नसलेल्या १४ रेल्वे विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.या विशेष गाड्या ४ डिसेंबर ते ८ डिसेंबर दरम्यान चालणार आहेत.
यामध्ये नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस,मुंबई दरम्यान तीन विशेष रेल्वे गाड्या,छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई ते नागपूर दरम्यान सहा विशेष रेल्वेगाड्या आणि कलबुर्गी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दरम्यान दोन विशेष रेल्वेगाड्या,सोलापूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई दरम्यान दोन विशेष रेल्वेगाड्या आणि अजनी (नागपूर) ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत एक विशेष रेल्वेगाडी सोडली जाणार आहे.नागपूरहून ४ डिसेंबर रोजी रात्री १ – ५५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे दुसऱ्या दिवशी दुपारी ३-३० वाजता पोहोचेल.तर विशेष गाडी ५ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता नागपूरहून सुटेल आणि त्याच दिवशी पावणे बारा वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल. विशेष गाडी ५ डिसेंबर रोजी नागपूरहून सुटणारी गाडी नागपुरातील अजनी,सेवाग्राम,वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, जलंब, मलकापूर, भुसावळ,जळगाव, चाळीसगाव,मनमाड, नाशिकरोड,इगतपुरी, कसारा, कल्याण आणि दादर येथे थांबे असतील. या विशेष गाड्यांना सामान्य द्वितीय श्रेणीचे १६ डबे तर व आणि सामान्य द्वितीय श्रेणीचे १२ डबे असतील.
कलबुर्गी ते मुंबई अनारक्षित दोन स्पेशल रेल्वेगाड्या गाड्या सोडल्या जाणार आहेत.एक गाडी कलबुर्गी येथून ५ डिसेंबर रोजी संध्याकाळी ६.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ८.२० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून ७ डिसेंबर रोजी मध्यरात्री १२.२५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी ११.३० वाजता कलबुर्गी येथे पोहोचेल.या गाडीला गंगापूर रोड, अक्कलकोट रोड, सोलापूर,कुर्डूवाडी,दौंड,पुणे, लोणावळा, कल्याण आणि दादर येथे थांबे असतील. या रेल्वेगाडीला सामान्य, द्वितीय श्रेणीचे ७ डबे असतील.या गाडीचे कुर्डुवाडी, दौंड, पुणे, लोणावळा, कल्याण आणि दादर येथे थांबे असतील. तर १० सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे असतीलया गाडीचे वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण आणि दादर येथे थांबे असतील. या रेल्वेगाडीमध्ये सामान्य, द्वितीय श्रेणीचे १६ डबे असतील.