नवी दिल्ली: जागतिक मंदीचं मळभ अधिक गडद होताना दिसून येत असून, गुगलसह अनेक दिग्गज कंपन्यांनी कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे. डेल आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी ५ टक्के कमर्चाऱ्यांची नोकर कपात करणार आहे. डेल कंपनी ६,६५० कर्मचाऱ्यांची नोकरी जाणार आहे.
कंपनी बाजारातील परिस्थिती अनुभवत असून, दिवसेंदिवस यात अधिक अनिश्चितता येत असल्याचे कंपनीचे सह-चीफ ऑपरेटिंग ऑफिसर जेफ क्लार्क यांनी म्हटले आहे. त्यामुळे कंपनीने जागतिक कर्मचाऱ्यांपैकी सुमारे 5% कर्मचारी कपात करणार आहे. यापूर्वी कंपनीने २०२० मध्ये कोविड महामारीच्या काळात कर्मचारी कपातीची घोषणा केली होती. २०२३ मध्ये कर्मचाऱ्यांची कपात करणारी डेल ही प्रमुख लॅपटॉप कंपन्यांपैकी पहिली कंपनी आहे. ब्लूमर्गच्या अहवालानुसार कंपनीचे को-चीफ ऑपरेटिंग ऑफिसर जेफ क्लार्क यांनी सांगितले की, कंपनी ही बाजारातील परिस्थितीवर अवलंबून आहे. त्यामुळे भविष्यात कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांची कपात करू शकते.