संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

डीसीपींच्या परवानगीने होणार विनयभंगाचा गुन्ह्या दाखल

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई : पॉस्को किंवा विनयभंग प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी यापुढे डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे, असे आदेश मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी जाहीर केले आहे. पॉस्को कायद्याच्या होणाऱ्या गैरवापारामुळे हा निर्णय घेण्यात आला. जुने भांडण, प्रॉपर्टीचे वाद, वैमनस्य अशा अनेक कारणांमुळे पोलीस स्थानकात खोट्या तक्रारी झाल्या आहेत. मात्र, अनेक प्रकरणांमध्ये चौकशीनंतर आरोपी निर्दोष आढळून येण्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे अशा खोट्या तक्रारींची वाढती संख्या लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आल्याचे पांडे यांनी म्हटले आहे. यामुळे खोट्या तक्रारींना आळा बसेल आणि त्यामुळे निर्दोष व्यक्तींची नाहक बदनामी टळेल अशी अशा व्यक्त केली जात आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami