पुणे – मुंबईसह राज्याच्या विविध भागात डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात थंडीचा जोर वाढणार आहे. तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार आहे. सध्या तापमानाचा पारा देखील सरासरीपेक्षा एक ते दोन सेल्सिअसने खाली आला आहे.त्यामूळे कोकणसह मुंबईत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.पुढील तीन दिवस साधारण थंडीबरोबर तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यताही नाकारता येत नसल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे.
पुढच्या दोन दिवसानंतर डिसेंबरचे पहिले १० दिवस कोकणात थंडीचा जोर वाढणार आहे.उत्तर महाराष्ट्रासह विदर्भात थंडीचा जोर वाढणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगांव आणि नाशिक या चार जिल्ह्यात थंडीचा जोर वाढणार असल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली.याठिकाणी तापमानाचा पारा घसरला असल्याने नागरिकांमध्ये हुडहुडी भरली आहे. दुसरीकडे संपूर्ण विदर्भात थंडीचा पारा वाढला आहे. विदर्भात थंडीचा कडाका वाढल्याने ठिकठिकाणी शेकोट्या पेटवल्या आहेत. थंडीचा पारा आणखी वाढण्याची शक्यता माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे.मराठवाड्यात तापमानाचा पारा घसरला आहे. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला आहे. तिथेही ठिकठिकाणी शेकोट्या पेटलेल्या दिसत आहेत. मराठवाड्यात तापमानाचा पारा दोन ते चार अंश सेल्सिअसने घसरला आहे. सध्या मराठवाड्यात आठ ते १० अंश सेल्सिअस तापमान आहे.७ डिसेंबरपर्यंत थंडीचा जोर कायम राहणार असल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली आहे.