संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

डास ठराविक माणसांनाच चावतात! शास्त्रज्ञांना संशोधनातून मिळाली कारणे

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – दरवर्षी जगभरात लाखो लोक डासांमुळे पसरणाऱ्या कोणत्या ना कोणत्या आजाराने ग्रस्त असतात. मलेरिया हा डास चावल्यामुळे होणारा सर्वात सामान्य आणि धोकादायक रोग आहे.जेव्हा एखादा संक्रमित डास निरोगी व्यक्तीला चावतो तेव्हा त्या व्यक्तीला मलेरियाची लागण होऊ शकते.पण हे डास ठराविक माणसांनाच चावतात.त्याची कारणे आता शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनातून उघड झाली आहेत.ज्या व्यक्तीच्या अंगावर जास्त फॅटी अ‍ॅसिड असतात.त्यांच्याकडे डास जास्त प्रमाणात आकर्षित होतात.

हॉवर्ड ह्युजेस वैद्यकीय संस्थेचे मुख्य वैज्ञानिक अधिकारी लेसली वॉसहॉल यांनी यासंदर्भात तब्बल तीन वर्षे संशोधन केले होते. त्यातून या डास चावण्यासंदर्भात काही शास्त्रीय माहिती हाती लागली आहे.त्यांनी आठ व्यक्तिंना वेगवेगळ्या चेंबरमध्ये ठेवले असता त्यातील काही ठराविक लोकांनाच डास चावल्याचे दिसून आले. या सर्वांना दिवसातून सहा तास नायलॉनचे कपडे घालण्यास दिले होते.तसेच त्यांच्यातील एका चेंबरमध्ये झिका, डेंग्यू, यलो फिव्हर आणि चिकन गुनिया असे विविध आजार फैलावणारे डास सोडले होते.मात्र या डासांनी ठराविक लोकांनाच दंश केल्याचे आढळून आले. ज्यांना हे डास चावले होते, त्यांच्या शरीरात त्वचेवर ५० रेणूसूत्रे सापडली. या व्यक्तींनी जास्त प्रमाणात कार्बोलिक अ‍ॅसिड बाहेर सोडले होते.त्यामुळे ते डास त्यांच्याकडे आकर्षित झाले.या संशोधनातून काही जातींच्या डासांचा अभ्यास करता आला तरी यातून आणखी काही जातींचा अभ्यास करण्याची प्रेरणा मिळून एक जागतिक सत्य उघडकीस येऊ शकते असे आता शास्त्रज्ञांना वाटू लागले आहे. दरम्यान, माणसाच्या शरीरातून बाहेर पडणारे दोन प्रकारचे वास, शरीराचे तापमान ओळखण्याची क्षमता या डासांमध्ये असते. माणसाच्या शरीरातून ओको आणि आयआर रिसेप्टर्स असे दोन प्रकारचे वास बाहेर पडत असतात.तसेच मादी डासचा माणसाला चावत असतो.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami