संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 27 November 2022

डाबरचा मसाला बाजारात प्रवेश! बादशहा कंपनीशी करार केला

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली : बादशहा मसाला म्हणून प्रसिद्ध मसाला कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे. या कंपनीने आपले शेअर्स विक्रीला काढले आहेत. डाबर इंडिया कंपनीने आता बादशाह मसाला प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची ५१ टक्के भागीदारी खरेदी करण्यासाठी अॅग्रीमेंट केले आहे. त्यामुळे डाबर कंपनी आता मसाला बाजारात प्रवेश करणार आहे.

देशातील आघाडीची एफएमसीजी कंपनी डाबर इंडियाने बादशाह मसाला कंपनीतील 51 टक्के हिस्सा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही कंपन्यांनी जारी केलेल्या संयुक्त निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. दिलेल्या माहितीनुसार, डाबर इंडिया कंपनी बादशाह मसालामधील 51 टक्के स्टेक 587.52 कोटी रुपयांना खरेदी करणार आहे.बादशाह मसाला मिश्र मसाले आणि इतर खाद्यपदार्थांचे उत्पादन निर्यात करते. डाबर इंडियाने स्टॉक एक्स्चेंजला सांगितले की फूड सेगमेंटच्या नवीन श्रेणींमध्ये प्रवेश करण्याच्या कंपनीच्या धोरणात्मक हेतूनुसार हे अधिग्रहण आहे. म्हणजेच डाबर इंडिया आपला व्यवसाय वाढवण्याच्या तयारीत आहे. डाबरने दिलेल्या माहितीनुसार, बादशाह मसालाचे कंपनीचे मूल्य 1,152 कोटी रुपये होते. उर्वरित ४९ टक्के इक्विटी स्टेक पाच वर्षांनी विकत घेतले जातील. डाबर इंडियाचा फूड व्यवसाय तीन वर्षांत 500 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा मानस आहे, असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami