संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

डबे जोडण्याचे काम सुरू
राज ठाकरेंचे सूचक विधान

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे नेते आणि सरचिटणीस यांच्यासोबत आज बैठक घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आज अंतर्गत बैठक आहे, इतका मसाला काही आज मिळणार नाही, पण डबे जोडण्याचे काम सुरू आहे, असे सूचक विधान राज ठाकरेंनी केले आहे. या विधानामुळे शिंदे गट आणि मनसेमध्ये युती होण्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
लवकरच महापालिका निवडणुका लागणार आहेत. निवडणुकांमध्ये जास्तीतजास्त नगरसेवक निवडून यावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कंबर कसली आहे. येत्या निवडणुकीत मनसेमध्ये शिंदे गट विलीन होण्याची शक्यता आहे. तसेच भाजपाबरोबर मनसेची युती होण्याची शक्यता आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात काय राजकीय समीकरणे होतात याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, राज ठाकरे 18 सप्टेंबरपासून विदर्भ दौर्‍यावर जाणार आहेत. ठाकरे 17 सप्टेंबरला मुंबईहून रेल्वेने नागपूरकडे रवाना होतील. 18 ला सकाळी त्यांचे नागपूरला आगमन होईल. येथे त्यांचा दोन दिवस मुक्काम आहे. या काळात ते विदर्भातील पदाधिकार्‍यांशी चर्चा करतील. 20 तारखेला ते चंद्रपूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. राज ठाकरे 21 ला अमरावती जिल्ह्याच्या दौर्‍यासाठी निघतील. तेथे दोन दिवस पश्चिम विदर्भातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करतील. 23 ला मुंबईकडे रवाना होतील.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami