ठाणे – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘चला जाणूया नदीला’ हे अभियान राबवले जात आहे. २ आक्टोंबर २०२२ ते २६ जानेवारी २०२३ या काळात या अभियान अंतर्गत राज्यातील ७५ नद्यांना भेटी देऊन अभ्यास केला जाणार आहे. त्यात ठाणे जिल्ह्यातील भातसा, उल्हास आणि वालधुनी या प्रमुख नद्यांचा समावेश आहे. अभियानाचा पहिला टप्पा ३० नोव्हेंबरला पूर्ण होणार आहे. त्यात या नद्यांचा अभ्यास केला जाणार आहे. त्यानंतर लोकसहभागातून नद्यांचे पुनरुज्जीवन केले जाणार आहे.
प्रदूषण, अतिक्रमण आणि नदीपात्रात साचलेला गाळ यामुळे राज्यातील अनेक नद्या अखेरच्या घटका मोजत आहेत. काही नद्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. तेव्हा त्यांच्या पुनरुज्जीवनासाठी ‘चला जाणूया नदीला’ हे अभियान राबवले जात आहे. त्यात लोक सहभागातून नद्यांचे पुनरुज्जीवन केले जाणार आहे. या अभियानात ‘अमृत नदी’ यात्रा आयोजित केली आहे. २ ऑक्टोंबर २०२२ ते २६ जानेवारी २०२३ या काळात या अभियानात राज्यातील ७५ नद्यांना भेटी दिल्या जातील. अभियानाचा पहिला टप्पा ३० नोव्हेंबरला पूर्ण होणार आहे. त्यात अभ्यासावर भर दिला जाणार आहे. १ ते ३१ डिसेंबर २०२२ या काळात यात्रेचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे. त्यात नद्यांचे उगमस्थान ते संगमापर्यंतची त्यांची अवस्था काय आहे, त्यांच्या पुनरुज्जीवनासाठी काय करावे लागेल याचा अभ्यास केला जाणार आहे. या अभियानात ठाणे जिल्ह्यातील भातसा, उल्हास, वालधुनी या प्रमुख नद्यांसह कुंभेरी, कामवारी, भारंगी, कनकवीरा, चोरनदी, लेणाड नदी, कुशिवली नदी यांचाही समावेश आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावर त्यासाठी समिती स्थापन केली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार आहे. त्यात अनेक विभागांच्या प्रमुखांचा समावेश आहे.
ओढे, अभ्यास ठाणे जिल्ह्यात
नद्यांबरोबरच अनेक ओढे आणि नालेही आहेत. त्यांच्याही पुनरुज्जीवनासाठी या अभियानात त्यांचा अभ्यास केला जाणार आहे. जलनायक डॉ. स्नेहल दोंदे या अभियानात जिल्हा समन्वयक म्हणून काम करणार आहेत. त्यात नद्यांबरोबरच त्यांच्या खोऱ्यातील नाले, ओढे आणि उपनद्यांच्या पुनरुज्जीवनासाठीही अभ्यास आणि उपाययोजना केल्या जाणार आहेत. त्यासाठी सरकारी संस्था, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांचे सहकार्य घेतले जाणार आहे.