संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 29 September 2022

ठाणे शहरात बुधवारी
पाणीपुरवठा बंद राहणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

ठाणे – गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भातसा नदीला आलेल्या पुरामुळे पिसे येथील पंपाच्या मुखाजवळ कचरा अडकल्याने महापालिकेला पुरेश्या प्रमाणात पाणी उचलणे शक्य होत नसून हा कचरा काढण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर इंदिरानगर पंप येथील जलवाहिनी जोडणीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिकेचा स्वतःच्या योजनेतील पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याने बुधवार, 21 ऑगस्ट रोजी शहराच्या काही भागांचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. या पावसामुळे भातसा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यासोबत गाळ आणि कचरा वाहून आला असून तो ठाणे शहराला पाणी पुरवठा करणार्या पिसे बंधार्यावरील पंपाच्या मुखाशी अडकला आहे. यामुळे पुरेशा पाण्याचा उपसा करणे शक्य होत नसल्यामुळे बुधवारी सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत 12 तासांसाठी ठाणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami