संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

ठाणे पालिकेची आर्थिक स्थिती बिकट! तिजोरीत फक्त ३ कोटी रुपये शिल्लक

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

ठाणे – मुंबई आणि पिंपरी- चिंचवड या श्रीमंत महापालिकांच्या रांगेत असलेल्या ठाणे महापालिकेची आर्थिक परिस्थिती सध्या बिकट बनली आहे. काही दिवसांपूर्वीच दिवाळी निमित्त मासिक वेतन, बोनससाठी ८८ कोटी आणि घन कचरा विभागातील कंत्राटदारांची साधारणपणे ४० कोटी रूपयांची बिले केवळ एकाच महिन्यात अदा करण्यात आल्याने पालिकेच्या तिजोरीत खडखडाट दिसत आहे.पालिकेकडे सध्या केवळ ३ कोटी रुपये शिल्लक असल्याची माहिती सांगण्यात येत आहे.

विशेष म्हणजे या वर्षात पालिकेचे उत्पन्न चांगले येत असले तरी गेल्या काही वर्षातील ठेकेदाराचे दायित्व शिल्लक असल्याने ते पैसे देण्यासाठी तिजोरी रिकामी करावी लागली आहे.
दुसरीकडे उत्पन्नाचे नवे मार्ग शोधण्यात प्रशासनाला अपयश आले असल्याने जमा खर्चाचा ताळमेळ लावण्यात प्रशासनाला मोठी कसरत करावी लागणार आहे.तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतलेल्या निर्णयामुळे पालिकेला चांगले उत्पन्न मिळाले होते.मात्र २०२० मधील कोरोना परिस्थितीमुळे पालिकेचे ३८६१ कोटी उत्पन्न टार्गेट काही पूर्ण करता आले नव्हते.त्याकाळात फक्त २३९७ कोटी रूपयांची वसुली करता आली.पुढच्या वर्षातही ४०८५ हजार कोटींचे टार्गेट ठेवले असताना २८०७ कोटींचे उत्पन्न मिळाले होते.अशा खस्ता परिस्थितीमध्येही कर्मचार्‍यांना दिवाळीसाठी पगार,बोनस आणि कंत्राटदारांची बिलेही एकाच वेळी देणे भाग पडले. त्यामुळे आता तिजोरी रिकामी झाल्याचे कळते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami