संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

ठाकरे गटातील उरलेले आमदरही आमच्या संपर्कात! राणेंचा दावा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई : नारायण राणे यांना उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.ठाकरेंचे राजकारण हे फक्त मातोश्रीपुरते मर्यादित आहे. त्यामुळे ठाकरे गटातील उरलेले आमदारसुद्धा आमच्यासोबत येतील असा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. केंद्र सरकारच्या वतीने देशात काही तरुणांना नोकरीची नियुक्ती पत्रे देण्यात आली. पुण्यातही ‘यशदा’ येथे राणे यांच्या हस्ते तरुणांना नियुक्तीपत्र देण्यात आले. या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेत फूट पडली. त्यांच्यासोबत शिवसेनेचे काही आमदरही शिंदे गटात गेले. या राज्यातील अभूतपूर्व राजकीय घडामोडीनंतर आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली. केंद्रीय मंत्री नारायण राणे हे सातत्याने उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटावर टिकास्त्र डागत असतात.त्यातच आता नारायण राणे यांनी मोठा दावा केला आहे.नारायण राणे माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, ठाकरे सोडून संपूर्ण महाराष्ट्र आणि देश आहे. ठाकरेंचे मातोश्रीपुरतेच राजकारण असल्याने त्यांच्याबद्दल का बोलता? तसेच आता शिवसेना कुठे राहिलेय? ठाकरे गट संपला आहे. आता ठाकरे गटातील उरलेले 6 ते 7 आमदारसुद्धा आमच्यासोबत येण्याच्या वाटेवर आहेत,असे नारायण राणे म्हणाले. याशिवाय महाराष्ट्राच्या राजकारणातील स्तर खालावलेला नाही. विरोधकांच्या वैचारिक पातळी तपासण्याची गरज आहे. मला राजकारणातील स्तर घसरू नये असे वाटते असे राणे यावेळी म्हणाले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami