संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 27 November 2022

ठाकरे गटाच्या प्रतिज्ञापत्र बादबाबत निर्णय नाही! आयोगाने दिले स्पष्टीकरण

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली- केंद्रीय निवडणूक आयोगानं ठाकरे गटाकडून सादर करण्यात आलेले अडीच लाख प्रतिज्ञापत्रं बाद केल्याचे वृत्त पसरले आहे. मात्र याबाबत निवडणुक आयोगाने स्पष्टीकरण दिलं आहे. ठाकरे गटाची शपथपत्र बाद करण्याचा अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. ठाकरे गटाची शपथपत्र निवडणुक आयोगाला मिळाली आहेत. शपथपत्र तपासणीचे काम सुरू आहे, असे निवडणुक आयोगाने स्पष्ट केलं आहे.

ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे ११ लाख प्रतिज्ञापत्रे सादर करण्यात आली आहेत. यातील अडीच लाख प्रतिज्ञापत्रे बाद करण्यात आली आहेत. अशा वृत्ताची चर्चा सुरु आहे. निवडणूक आयोगाबरोबर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे की, प्रतिज्ञा पत्र बाद झाल्याची बातमी खोटी असून बातमीच्या स्त्रोतावर विश्वास ठेवू नका .ठाकरे गटाचे प्रतिज्ञापत्रे रद्द झाले, असा नॅरेटीव्ह सेट करण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू आहे. लोकांमध्ये भ्रम पसरवण्याचा हा प्रयत्न सुरू आहे. ज्याप्रमाणे ईडीच्या कारवाई करण्याआधी पहिले एखाद्या नेत्यावर आरोप केले जातात. त्याची प्रतिमा डागाळली जाते व नंतर ईडी कारवाई केली जाते.ठाकरे गटाचे प्रवक्ते व खासदार अरविंद सावंत यांनी आरोप केला आहे की, आता निवडणूक आयोग काय निर्णय देणार, याबाबत लोकांमध्ये नॅरेटीव्ह सेट करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami