संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 29 September 2022

ठाकरेंना दे धक्का! मेट्रो कारशेड आरेत आणण्याचा फडणवीसांचा पहिला आदेश

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – मोठ्या राजकीय नाट्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आले. त्याच्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंना धक्का दिला. मेट्रो कारशेड आरे कॉलनीतच बांधण्यात येणार असल्याने त्याबाबत सरकारची बाजू न्यायालयात मांडा, असा आदेश त्यांनी महाधिवक्त्यांना दिला. जलसंधारण योजनाही पुन्हा सुरू करण्याबाबत प्रस्ताव तयार करण्याचा आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला.

देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात आरे कॉलनीत मेट्रोच्या कारशेडला परवानगी दिली होती. मात्र त्याला शिवसेनेचा विरोध होता. महाविकास आघाडी सत्तेवर येताच आरेतील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु आता महाराष्ट्रात पुन्हा सत्तांतर झाल्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारने महाविकास आघाडी सरकारच्या मेट्रो कारशेड निर्णयाला स्थगिती दिली. हे कारशेड पुन्हा आरे कॉलनीत नेण्याचा त्यांचा विचार आहे. याबाबत कोर्टात बाजू मांडावी, अशा सूचना त्यांनी महाधिवक्त्यांना दिल्या आहेत. त्यामुळे आता मेट्रो कारशेडचा वाद पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. आरेत मेट्रो कारशेडने पर्यावरणाची हानी होईल. त्यामुळे तिथे कारशेड बांधू नये, असे शिवसेनेचे म्हणणे आहे. पर्यावरणप्रेमींचाही या कारशेडला विरोध आहे. असे असताना फडणवीस यांनी महाविकास आघाडीचा निर्णय स्थगित करून मेट्रो कारशेड आरे कॉलनीत बांधण्यासंदर्भात न्यायालयात बाजू मांडावी, असा आदेश फडणवीस यांनी महाधिवक्त्यांना दिला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami