संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 29 January 2023

ट्विटर वापरण्यास ट्रम्प यांचा नकार! २२ महिन्यांनीअकॉउंट सुरु केले होते

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

न्यूयॉर्क- अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे दिड वर्षांपूर्वी ट्विटर अकॉउंट कंपनीकडून बंद करण्यात आले होते. तब्बल २२महिन्यांनंतर ट्रम्प यांच्या अकाऊंटवरून बंदी हटवण्यात आली आहे. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ट्विटरमध्ये रस नाही, तसेच त्यांनी ट्विटर वापरण्यास स्पष्ट नकार दिला असल्याचे समजते.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाउंट रिस्टोअर करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी ट्विटरचे नवे मालक एलॉन मस्क यांनी एक सर्वेक्षण केले होते. या दरम्यान १५ मिलीयन यूजर्सनी ट्रम्प यांचे खाते पुन्हा सक्रिय करण्यास समर्थन केले. त्या आधारावर मस्क यांनी हा निर्णय घेतला होता. एलॉन मस्क यांनी ट्विटरवर केलेल्या मतदानानंतरच जाहीरपणे ट्रम्प यांचे अकॉउंट सुरु करण्यात आल्याची माहिती दिली. मात्र ट्रम्प यांचे अकाउंट रिस्टोअर केल्यानंतर एका व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये ट्रम्प म्हणाले, “माझ्याकडे ट्विटरवर परतण्यासाठी कोणतेही कारण नाही. मला याचे कोणतेही विशेष कारण दिसत नाही. ट्विटर आता केवळ बनावट खात्यांनी भरले आहे. यामुळे मला ज्या समस्यांना सामोरे जावे लागले ते अविश्वसनीय होते.

त्यांच्या विधानात त्यांनी एलॉन मस्क यांचे कौतुक करत असेही सूचित केले की ते त्यांचे स्वत:चे ट्रुथ सोशल’ या प्लॅटफॉर्मवर सक्रीय राहणार आहेत. ‘ट्रम्प मीडिया अँड टेक्नॉलॉजी ग्रुप’ या त्यांच्याच स्टार्टअपने हे अ‍ॅप विकसित केले आहे. हे अ‍ॅप ट्विटरपेक्षा चांगले असून यावर युजर्सही अधिक असतील असा दावाच ट्रॅम्प यांनी केला आहे. आगामी २०२४ मधील अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक डोनाल्ड ट्रम्प लढणार आहेत.दरम्यान, ६ जानेवारी २०२१ रोजी अमेरिकेत दंगल झाली होती. यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांना देखील जबाबदार धरण्यात आले होते. या दंगलीतील त्यांच्या भूमिकेबाबत अमेरिकेत त्यांची चौकशी सुरू आहे. याच दरम्यान, ते आपल्या समर्थकांशी मुख्यतः ट्विटरद्वारे बोलत असत. यानंतर ट्रम्प यांना सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मवरून बंदी घालण्यात आली होती.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami