नवी दिल्ली – ट्विटर मधील एका २५ वर्षीय भारतीय कर्मचाऱ्याच्या नोकरीवरही गदा आली आहे. मात्र त्याने यावर कंपनीसाठी कृतज्ञता व्यक्त केली असल्याचे ट्विट केल्याचे समोर आले आहे. ट्विटरची नोकरी गमावलेल्या यश अग्रवाल या तरुणाने ट्विट करत म्हटले आहे की, नुकताच कामावरून काढलो गेलो आहे. मात्र या टीमचा भाग असणं आणि त्यांच्यासोबत त्या वातावरणात काम करणं ही अतिशय सन्मानाची बाब होती. नोकरी गमावली तर काय? आयुष्य तर थांबलेलं नाही कंपनीतून काढलो गेलो आहे . यापेक्षा कंपनीनं आपल्याला कित्येक चांगल्या गोष्टी मिळवून दिल्या. चांगले अनुभव दिले याचीच जाणीव ठेवावी, असे म्हणत तो कृतज्ञता व्यक्त करताना दिसत आहे.
यश अग्रवाल याच्या या सकारात्मक दृष्टीकोनानं नेटकरीही भारावले आहेत. लिंकेढ प्रोफाईलवर दिलेल्या माहितीनुसार यश ट्विटरमध्ये पब्लिक पॉलिसी असोसिएट म्हणून ट्विटर इंडिया आणि साऊथ एशिया साठी काम पाहत होता.सहसा कोणत्याही व्यक्तीसाठी नोकरी सर्वतोपरी महत्त्वाची असते. तिच्याच बळावर तो आपली जीवनशैली जगतो आणि भविष्याला आकार देत असतो हीच नोकरी गमावल्यानंतर मनात काय कोलाहल असेल याची अनेकांनाच कल्पना आहे. एलॉन मस्क यांच्याकडे ट्विटरची जबाबदारी जाताच त्यांनी या कंपनीमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला वरिष्ठ अधिकाऱ्यांना कामावर काढून टाकणारे मेल पाठवल्यांनंतर कर्मचाऱ्यांना कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखला. आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर ट्विटरकडून भारतात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही असे कंपनीतून बाहेर काढण्यात येत असल्याने काहींनी नाराजीचे सूर लावला आहे