संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 22 March 2023

ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्रामही चालेना
अमेरिकेतील वापरकर्त्यांची गैरसोय

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

सॅन फ्रान्सिस्को – ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्रामचे जगभरात हजारो वापरकर्ते आहेत. मात्र, सध्या हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म डाउन झाले आहेत. त्यामुळे अमेरिकेतल्या वापरकर्त्यांकडून याबाबत सर्वाधिक तक्रारी नोंदवल्या जात आहेत. ट्विटरचा सर्व्हर डाउन झाल्याने अनेक वापरकर्त्यांना त्यांच्या खात्यावर लॉग इन करताना अडचणी येत आहेत. ट्विटडेक देखील काम करत नसल्याने वापरकर्त्यांची गैरसोय होत आहे. याशिवाय अनेक यूजर्सने फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या सर्व्हरबाबतही तक्रारी केल्या आहेत.
काही वापरकर्त्यांनी नवीन ट्विट पोस्ट करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना एक पॉप-अप प्राप्त झाला. ज्यामध्ये “तुम्ही ट्विट्स पाठवण्याची दैनिक मर्यादा ओलांडली आहे” असे संदेश आले. या तक्रारींनंतर ट्विटरच्या सपोर्ट टीमने सांगितले की, ‘त्यांना ही तांत्रिक अडचण समजली असून तिचे निराकरण करण्यासाठी ते काम करत आहेत. तुमच्यापैकी काहींच्या अपेक्षेप्रमाणे ट्विटर कदाचित काम करत नसेल. त्रासाबद्दल क्षमस्व आहोत. आम्ही जागरूक आहोत आणि ही अडचण दूर करण्यासाठी काम करत आहोत’, असे ट्विटर सपोर्टकडून सांगण्यात आले.
इलॉन मस्क यांनी सीईओ म्हणून पदभार स्वीकारल्यापासून ट्विटरला अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. आउटेज ट्रॅकिंग वेबसाइट डाउनडिटेक्टरने देखील ट्विटर आणि फेसबुक व इंस्टाग्राम प्लॅटफॉर्मसाठी वापरकर्त्यांच्या ग्लिच रिपोर्टमध्ये वाढ नोंदवली. १२,००० पेक्षा जास्त फेसबुक वापरकर्त्यांनी आणि इंस्टाग्रामसाठी सुमारे ७,००० वापरकर्त्यांनी तांत्रिक अडचणी नोंदवल्या.

आजचे हवामान
ताज्या बातम्या