संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 29 September 2022

कॅबिनेटची बैठक संपली; आदित्य ठाकरे गैरहजर

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – एकनाथ शिंदे यांनी शिवसेना खिळखिळी केल्यानंतर ठाकरे सरकारच्या स्थैर्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. सरकार कोसळण्याच्या चर्चा सुरू असताना आता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटरवरून मंत्रिपदाचा उल्लेख हटवला आहे अशा बातम्या फिरत आहेत. त्यामुळे आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. दरम्यान, कॅबिनेटची बैठक संपली असून या बैठकीमध्ये सध्या सुरू असणाऱ्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नसल्याची माहिती समोर आली आहे. महत्त्वाचे म्हणजे आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे उदय सामंत, दादा भुसे, गुलाबराव पाटील हेही या बैठकीला गैरहजर राहिले.

मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे हे काल शिवसेनेच्या काही आमदारांसह सूरतमध्ये पोहोचले. तेथील ले मेरिडियन हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे जवळपास ३५ आमदार होते. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन करून काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपासोबत सरकार स्थापन करण्याची ऑफर दिली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मिलिंद नार्वेकर, रवींद्र फाटक यांना चर्चा करण्यासाठी सूरतला पाठवले. मात्र ही चर्चा निष्फळ ठरली. त्यानंतर रात्री एकनाथ शिंदेंसह सर्व आमदारांना एअरलिफ्ट करून आसामच्या गुवाहाटीत नेण्यात आले. मग पहिल्यांदा एकनाथ शिंदे यांनी माध्यमांपुढे येत आपली भूमिका स्पष्ट केली. आम्ही शिवसेना सोडलेली नाही, सोडणारही नाही. बाळासाहेबांचा हिंदुत्त्वाचा विचार घेऊन पुढे जाणार, असे ते म्हणाले होते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami