न्यूयॉर्क- टेस्ला कंपनीचे मालक एलोन मस्क हे ट्विटरचे मालक बनले आहेत. एलॉन मस्क यांनी कंपनीच्या काही नियमांमध्ये बदल केले आहेत.ट्विटरवर ताबा मिळताच एलॉन मस्क यांनी नोकरकपातीचे संकेत दिले होते आणि ही भीती आता खरी ठरली आहे.एलन मस्क यांनी नोकरकपात केल्यानंतर आता ट्विटरपाठोपाठ मेटाअंतर्गत येणाऱ्या फेसबूकमध्ये मोठी कर्मचारी कपात करण्यात येणार आहे.
मेटा गेल्या अनेक महिन्यांपासून आर्थिक संकटांचा सामना करत आहे,त्यामुळे खर्च कमी करण्याकडे कंपनीचा कल वाढला आहे. यावर्षी मेटाचे शेअर्स ७३ टक्क्यांनी घसरले आहेत.जागतिक अर्थव्यवस्था मंदावली असून महागाई वाढली आहे. त्यामुळे मेटाला आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे.या कारणांमुळे फेसबूकमध्ये मोठया प्रमाणावर कर्मचारी कपात होणार आहे.अशी माहिती मिळत आहे. एका वृत्तसंस्थेने फेसबूकमध्ये होणाऱ्या कर्मचारी कपातीची माहिती रविवारी दिली. या माहितीनुसार, मेटाने कर्मचाऱ्यांना याबाबत आधीच पुर्वकल्पना दिली होती.सप्टेंबरच्या अखेरीस मेटाने जगभरात ८७,००० हून अधिक कर्मचाऱ्यांची नोंद केली आहे. ज्यामध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत २८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.