न्यूयॉर्क: ट्विटर एलॉन मस्क यांच्या हाती गेल्यापासून सातत्याने नवनवीन बदल घडून येत आहेत. त्याचा फटका युझर्सला मोठ्या प्रमाणात बसला असताना आता ट्विटरची प्रतिस्पर्धी भारतीय मायक्रोब्लॉगिंग साइट कूचे ट्विटर हँडल निलंबित करण्यात आले आहे.
कूचे ट्विटर हँडल सस्पेंड केल्याने कूचे सह-संस्थापक मयंक बिदावतका यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याविषयी बोलताना मयंक यांनी म्हटले की, “मी विसरलो इथे आणखी काही आहेत! असे ट्विट केले आहे. आता ‘तसेच “म्हणजे, या माणसाला किती कंट्रोल मिळवायचे आहे?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.कु’चे अकाऊंट निलंबित केल्यानंतर त्याच्या सह-संस्थापकाने ट्विटरच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कु यांचे खाते निलंबित करण्यामागे काय कारण असू शकते, असा सवाल त्यांनी केला आहे.
यापूर्वी, एलन मस्क यांनी ट्विटरवरून जगभरातील अनेक टीकाकार पत्रकारांना बाहेरचा रस्ता दाखवला होता. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्या मस्क यांनी गुरुवारी 15 डिसेंबर CNN, द वॉशिंग्टन पोस्ट, द न्यूयॉर्क टाइम्स आणि द इंडिपेंडंटसह अनेक प्रसिद्ध माध्यम संस्थांमधील पत्रकारांची ट्विटर अकाउंट सस्पेड केले होती.