संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 29 September 2022

टायर फुटल्याने धुळ्यात केमिकल टँकरला आग

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

धुळे – धुळे शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या मुंबई- आग्रा महामार्गावर केमिकलने भरलेल्‍या टँकरला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. टायर फुटल्याने टँकरला ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मुंबई-आग्रा महामार्गावर केमिकलने भरून जात असलेल्‍या धावत्‍या ट्रकच्‍या मागील बाजूने धुर निघत असल्‍याचे लक्षात आले. यानंतर ट्रक चालकाने रस्‍त्‍याच्‍या बाजूला ट्रक उभा केला.याबाबत अग्निशमन विभागाला या घटनेची माहिती देण्यात आल्यानंतर अग्निशमन विभागाचे बंब घटनास्थळी तात्काळ दाखल झाले.अग्निशमन विभागाच्या जवानांतर्फे आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.या दुर्घटनेमध्ये सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami