संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

टायर फुटल्याने ऑक्सिजन सिलेंडची वाहतूक करणाऱ्या ट्रकला भीषण आग

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नाशिक : मालेगावात ऑक्सिजन सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या ट्रकला आग लागली आहे. आग लागल्याने ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाला आहे. मनमाड मालेगाव मार्गावरती कानड गाव फाट्याजवळ टायर फुटल्याने हा स्फोट झाला आहे. या स्फोटामुळे पेट घेतलेले सिलेंडर वीस ते पंचवीस फूट उंच हवेत उडालेले पाहायला मिळाले.या दुर्घटनेत ट्रक चालक किरकोळ जखमी झाला आहे.मात्र स्फोटामुळे महामार्गावरची दुतर्फा वाहतूक ठप्प झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मनमाड-मालेगाव रस्त्यावर मनमाडकडून मालेगावकडे ८ किमी अंतरावर कुंदलगाव शिवारात ऑक्सिजन सिलेंडर घेऊन जाणारे वाहन उलटले. सुरतवरून औरंगाबादच्या दिशेने हा ट्रक जात असताना ट्रकमध्ये मोठ्या स्फोट झाला. प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार ट्रकचे पुढील टायर फुटल्याने ही घटना घडली. या अपघातामुळे वाहनातील सिलेंडरचा स्फोट होऊन टाक्या विखुरल्या.त्यामुळे सिलेंडरच्या पेटेलेल्या टाक्या लांब उडाल्या. हा अपघात झाल्यानंतर रस्त्यावरील वाहतूक खबरदारी म्हणून थांबवण्यात आली. त्यामुळे दोन्ही बाजूंनी ३ ते ४ किमी ट्रॅफिक जाम झाली होती. या अपघातामुळे चोंडी घाट देखील जाम झाला. कोणाला त्या परिसरात जाऊ दिले जात नाही. या अपघाताची माहिती मिळताच मनमाड व मालेगावचे अग्निशमन दल घटना स्थळी दाखल झाले असून आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami