संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्रींचे पालघरजवळ भीषण गाडी अपघातात निधन

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पालघर – टाटा उद्योग समूहाचे माजी अध्यक्ष आणि उद्योगपती सायरस मिस्त्री यांचे गाडी अपघातात निधन झाले आहे. अहमदाबादहून मुंबईला मर्सिडिस गाडीतून येत असताना सायरस मिस्त्री यांच्या गाडीला आज दुपारी सव्वातीनच्या सुमारास पालघरजवळ अपघात झाला. त्यांची मर्सिडिस गाडी डिव्हायडला धडकल्यामुळे हा अपघात झाला. अपघातात मिस्त्री यांच्यासह दोघांचा तात्काळ मृत्यू झाला आहे. तर इतर दोघा जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघात इतका भीषण होता की त्यांच्या गाडीचा चक्काचूर झाला .

पालघर येथील चारोटी परिसरातील सूर्या नदीवर सायरस मिस्त्री यांची गाडी आज भरधाव वेगात पोहोचली तेव्हा पूलावरील डिव्हायडरला धडकली. चालकाचा वेगावरील ताबा सुटल्याने ही भीषण दुर्घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती आहे.या दुर्घटनेमुळे उद्योग क्षेत्रात हळहळव व्यक्त केली जात आहे.मुख्यमंत्र्यांकडूनही भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. सायरस मिस्त्री हे केवळ एक यशस्वी उद्योजक नव्हते तर उद्योग विश्वातील एक तरुण, उमदे आणि भविष्यवेधी व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. एक कर्तबगार उद्योजक आपल्यातून गेला आहे. ही केवळ मिस्त्री कुटुंबियांची नव्हे तर देशातील उद्योग विश्वाची मोठी हानी आहे. माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

मुंबईत पारसी कुटुंबात सायरस मिस्त्री यांचा जन्म झाला. उद्योगपती पल्लोनजी मिस्त्री यांचे ते सुपूत्र होते. त्यांचे शिक्षण लंडन बिझनेस स्कूलमध्ये झाले. लंडनच्या इंपीरियल कॉलेजमधून त्यांनी पदवीचं शिक्षण घेतलं. ते 2006 साली टाटा समूहाचे सदस्य बनलेवयाच्या 43 व्या वर्षी 2013 साली ते टाटा समुहाचे अध्यक्ष बनले. परंतु चार वर्षांनंतर २०१६ मध्ये त्यांना अचानक पदावरून हटवण्यात आले. तेव्हापासून त्यांचे टाटा समूहाशी मतभेद होते. टाटा समूहानेच टाटा सन्समधील एसपी ग्रुपची हिस्सेदारी खरेदी करण्याची ऑफर दिली होती.ज्यासाठी मिस्त्री कुटुंब तयार नव्हते. हे प्रकरण कोर्टातही पोहोचले होते ज्याने टाटांच्या बाजूने निकाल दिला होता.सायसर मिस्त्री हे शापूरजी पल्लोनजी समुहाचे मॅनेजिंग डायरेक्टर होते.शापूरजी पालोनजी समूहाची टाटा सन्समध्ये १८.३७ टक्के भागीदारी आहे.

सुमारे सहा वर्षांपूर्वी मिस्त्री वादात टाटा समूहाची प्रतिष्ठा पणाला लागली होती. पण आता टाटा समूहाने भविष्यात असे वाद होऊ नयेत यासाठी खात्रीपूर्वक योजना आखली. टाटा समूहाची होल्डिंग कंपनी असणाऱ्या टाटा सन्सची सर्वसाधारण सभा नुकतीच झाली. यामध्ये कंपनीच्या आर्टिकल ऑफ असोसिएशनच्या कलम ११८ मध्ये बदल मंजूर करण्यात आला. त्यानुसार आता कोणतीही व्यक्ती टाटा सन्स आणि टाटा ट्रस्टचा अध्यक्ष होऊ शकत नाही. मात्र टाटा सन्सचा सर्वात मोठा अल्पसंख्याक भागधारक, मिस्त्री यांच्या नेतृत्वाखालील एसपी समूह मतदानात सहभागी झाला नव्हता.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami