संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 28 November 2022

‘झोपडपट्टीची दादागिरी नकाे, आम्ही बांगड्या भरल्या नाहीत’;

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

*शिंदे गटाच्या आमदारांना ठाकरे गटाचे प्रत्युत्तर

बुलढाणा – आम्ही काही बांगड्या भरल्या नाहीत. आमच्या नादाला लागू नकोस. गायकवाड तुम्ही चार लाखाचे नेतृत्व करित आहात चून चून के मारेंगे हे शिवसेनेला शिकवू नकोस, तू या राज्यातील अनेकांना डिवचलं आहेस, लक्षात ठेव अशा एकेरी भाषेत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटातील बुलढाणा जिल्हा संघटक छगन मेहेत्रे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांना इशारा दिला आहे.आमदार गायकवाड यांनी नुकतेच चून चून के मारेंगे अशी धमकी ठाकरे गटास अप्रत्यक्ष दिली हाेती. त्यास ठाकरे गटाने प्रत्युत्तर दिले आहे.
बुलढाणा येथील बाजार समितीच्या सभागृहात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या सत्कार कार्यक्रमात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी तुफान राडा केला होता.त्याचे समर्थन आमदार संजय गायकवाड यांनी केले.तसेच शिवसैनिकांना एक प्रकारे धमकीच दिली होती.या धमकीस ठाकरे गटाच्या पदाधिका-यांसह कार्यकर्त्यांनी सध्या तरी शाब्दिक प्रत्युत्तर देण्यास प्रारंभ केला आहे. जिल्हा संघटक छगन मेहेत्रे म्हणाले चून चुन के मारेंगे, गिन गिन के मारेंगे या आमदार संजय गायकवाड यांच्या धमकीला आम्ही जशास तसे उत्तर देऊ,आम्ही काही बांगड्या भरल्या नाहीत.आमच्या नादाला लागाल तर…., एकंदरीतच मेहेत्रे आणि ठाकरे गटाचे समर्थक आमदार गायकवाडांवर भडकल्याचे दिसून आले.
मेहेत्रे पुढे म्हणाले की, गायकवाड तुम्ही चार लाखाचे नेतृत्व करित आहात. चून चून के मारेंगे हे शिवसेनेला शिकवू नको. तु या राज्यातील अनेकांना डिवचले आहे. माजी आमदार विजयराज शिंदेना मारहाण केली, वारकऱ्यांना अपशब्द बोलून धमक्या दिल्या, मागास्वर्गीया विरुद्ध १० हजाराची फौज होती तलवारी हातात घेऊन उतरू, असे अनेकादा दादागिरी केली आहे. आता आम्हीही थांबणार नाही. जशास तसे उत्तर देऊ, लक्षात ठेव ! दुसरीकडे जिल्हा संपर्क प्रमुख प्रा नरेंद्र खेडेकर यांनी देखील आमदार गायकवाड यांचा समाचार घेत आमदार गायकवाड यांचा आम्ही फक्त प्रचार नाही तर वर्गण्या जमा करून निवडून आणलं ते काय आम्हांला चून चून के व गिन गिन के मारणार. जसं पेराल तसं उगवेल. ही झोपडपट्टीची दादागिरी आहे, आम्हीही त्यास जशास तसे उत्तर देऊ असे म्हटले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami