संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 05 February 2023

झहीर खानचे रेस्टॉरंट असलेल्या पुण्यातील मार्वल विस्टाला आग

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुणे – कोंढवा येथील लुल्लानगर चौकातील मार्वल विस्टा इमारतीच्या ७ व्या मजल्यावरील हॉटेलला आज पहाटे भीषण आग लागली. त्यात मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली. मात्र सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. भारताचा माजी क्रिकेटपटू झहीर खानचेही या इमारतीत हॉटेल आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज अग्निशामक दलाच्या जवानांनी व्यक्त केला. ४ फायर इंजिनच्या मदतीने त्यांनी आग आटोक्यात आणली.
कोंढवातील लुल्लानगर चौकात मार्वल विस्टा इमारत आहे. त्यात अनेक दुकाने, कार्यालये, सोन्या-चांदीची दुकाने आणि हॉटेल आहेत. या इमारतीच्या ७ व्या मजल्यावरील हॉटेलला आज पहाटे आग लागली. सकाळी कामावर जाणाऱ्या नागरिकांना इमारतीतून धूर येत असल्याचे दिसले. त्यांनी याची माहिती अग्निशामक दलाला दिली. त्यानंतर अग्निशामक दलाचे जवान ४ फायर इंजिनसह घटनास्थळी दाखल झाले. मात्र हॉटेलमध्ये गॅस सिलिंडरचे स्फोट झाल्याने आगीचा भडका उडाला. तिने उग्र रूप धारण केले. अग्निशामक दलाच्या जवानांनी शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. आगीत ७ व्या मजल्यावरील हॉटेल व टेरेसचे मोठे नुकसान झाले. आगीचे नेमके कारण समजलेले नाही. मात्र ती शॉर्टसर्किटने लागली असावी, असा प्राथमिक अंदाज अग्निशामक दलाच्या जवानांनी व्यक्त केला. या इमारतीमध्ये भारताचा माजी क्रिकेटपटू झहीर खान याचेही हॉटेल आहे. आगीत कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली. आगीवर नियंत्रण मिळवले असून आता कूलिंगचे काम सुरू आहे, असे अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami